देवगड: सरकारने पुस्तकांची व्यापकता वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘पुस्तकांचे एक गाव’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना विस्तारीत स्वरूपात करत असताना पहिल्या टप्प्यात पुस्तकांचे गाव’ विभागीय स्तरावर ६ महसुली विभागात करण्यात येणार आहे.गावागावात पुस्तकांबद्दलची आवड लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजू व्हावी ,त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे.
यामध्ये कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मराठी पत्रकारितेचे जनक असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या गावाला म्हणजेच पोंभुर्ल्याला हा मान मिळाला आहे.पोंभुर्ले येथील माणुसकी फौंडेशन या संस्थेमार्फत पुस्तकांचे गाव साकारणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद मधील वेरूळ ,नागपूर मधील नवापूर आणि पुण्यातील अंकलखोप(औदुंबर) येथेही पुस्तकांचे गाव साकारणार आहे ,


