सिंधुदुर्ग : ना. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कुडाळात रेकॉर्ड ब्रेक गर्दीत शिमगोत्सव स्पर्धा संपन्न

0
173
  • प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ महाविकास आघाडीच्या वतीने आयोजन

ब्राझीलच्या कार्निव्हलला लाजवेल असा हा शिमगोत्सव-ना. आदित्य ठाकरे

रोंबाट सादरीकरणात कै. आणा मेस्त्री ग्रुप नेरूर प्रथम

राधा नृत्यमध्ये श्री. देव गावडोबा कलेश्वर सातेरी मित्रमंडळ रायवाडी माड्याचीवाडी प्रथम

कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमीत्त महाविकास आघाडी कुडाळच्या वतीने शिमगोत्सव स्पर्धा काल सायंकाळी कुडाळ येथील क्रीडा संकुल मैदान येथे पार पडली. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमात येथील कलाकारांनी लोककलेचे अप्रतिम सादरीकरण केले.दरम्यान रात्रौ राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पहार घालून शाल,श्रीफळ, तलवार देऊन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

हजारो प्रेक्षकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली शिमगोत्सव स्पर्धा मोठ्या उत्साहात कुडाळ येथे पार पडली. राधानृत्य, दशावतार, शिमगोत्सवातील रोंबाट या लोककलांच्या माध्यमातून सादर केलेले कलाविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारेच होते. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीने हा कार्यक्रम आणखी लक्षवेधी ठरला. प्रत्येकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हे क्षण टिपत कार्यक्रमाची रंगत सर्वदूर पोहोचवली. कोकणातील लोककलेची स्पर्धेच्या माध्यमातून वाढविलेली व्याप्ती अविस्मरणीय होती. ब्राझीलच्या कार्निव्हलला लाजवेल असा हा शिमगोत्सव आहे. मुंबईतहि असा कार्यक्रम व्हावा अशी माझी इच्छा आहे. यापुढे हा शिमगोत्सव करताना जागतिक पर्यटन खेचण्याचा प्रयत्न असणार असल्याचे ना. आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्व कलाकार गायक यांचे अभिनंदन केले.

रोंबाट , व राधानृत्य सादरीकरण या दोन प्रकारात स्पर्धा संपन्न झाली. रोंबाट सादरीकरणात प्रथम क्रमांक कै. आणा मेस्त्री ग्रुप नेरूर पारितोषिक रोख रु २१ हजार, द्वितीय क्रमांक विलास मेस्त्री ग्रुप नेरूर पारितोषिक १५ हजार, तृतीय क्रमांक लोकराजा सुधीर कलिंगण ग्रुप नेरूर पारितोषिक १० हजार, उत्तेजनार्थ प्रथम बाबा मेस्त्री ग्रुप नेरूर ७ हजार, उत्तेजनार्थ द्वितीय ओंकार मित्रमंडळ नेरूर वाघ चवडी ७ हजार व सर्वांना आकर्षक चषक.
राधा नृत्य सादरीकरण प्रथम क्रमांक श्री. देव गावडोबा कलेश्वर सातेरी मित्रमंडळ रायवाडी माड्याचीवाडी पारितोषिक रोख रु १० हजार, द्वितीय क्रमांक ठाकर समाज ग्रामस्थ मंडळ पिंगुळी गुडीपूर ७ हजार, तृतीय क्रमांक श्री. देव गावडोबा माड्याचीवाडी ५ हजार व सर्वांना आकर्षक चषक देऊन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत स्पर्धेला प्रेक्षकांनी विक्रमी हजेरी लावली होती.

यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत संदेश पारकर,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे , जि. प. माजी गटनेते नागेंद्र परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजन नाईक, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, जयभारत पालव, संजय आंग्रे, आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, राजू कविटकर,वर्षा कुडाळकर, श्रेया परब, स्नेहा दळवी,मथुरा राऊळ विकास कुडाळकर, संजय भोगटे, कृष्णा धुरी,शेखर गावडे, सचिन कदम, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, दीपक आंगणे, सचिन काळप,सुशील चिंदरकर, रुपेश पावसकर, उदय मांजरेकर, किरण शिंदे, राजू गवंडे, श्रेया गवंडे,ज्योती जळवी,सई काळप, श्रुती वर्दम ,रामा धुरी,योगेश धुरी,मंदार गावडे, अमित भोगले,संदीप म्हाडेश्वर,दिनेश वारंग,चेतन पडते,राजेश म्हाडेश्वर,भूषण परूळेकर,कृष्णा तेली,पंकज वर्दम, मंजुनाथ फडके,कार्यालय प्रमुख गोट्या चव्हाण, स्वीय सहाय्यक बाबी गुरव,नितीन राऊळ आदीसह महविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी चांगले नियोजन केले होते.नेरूरचे विनय गावडे, देवेंद्र गावडे तसेच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

   

          
     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here