माणगांवातील आ.वैभव नाईक चषक कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी फोंडा संघ विजेता

0
162

प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

माणगांव: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगांव येथे आयोजित केलेल्या आ.वैभव नाईक चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी फोंडा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर जय महाराष्ट्र, सावंतवाडी संघाने द्वितीय क्रमांकावर नाव कोरले. यावेळी शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत आ. वैभव नाईक यांच्या हस्ते या दोन्ही संघांना रोख रक्कम, चषक देवुन सन्मानित करण्यात आले.

माणगांव बाजार येथे आमदार वैभव नाईक चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातुन 16 संघांनी सहभाग घेतला होता. दोन्ही दिवस झालेल्या चुरशीच्या सामन्यात पंचक्रोशी फोंडा व जय महाराष्ट्र सावंतवाडी संघात अंतिम लढत लागली, ही लढत लक्षवेधी झाली. विशेष म्हणजे सामन्याच्या दुसर्‍या दिवशी रविवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सेमी फायनल व फायनल पार पडली. शेवटच्या अंतिम फायनलच्या लढतीत जय महाराष्ट्र सावंतवाडी संघावर पंचक्रोशी फोंडा संघाने मात करत विजय मिळविला आणि चषकासह 21 हजार रूपयाचे बक्षिस पटकवित आ. वैभव नाईक चषक कबड्डी स्पर्धेतील प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले तर याठिकाणी जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाने दुसर्‍या क्रमांकाच्या चषकासह 15 हजार रूपयाचे बक्षिस पटकविले.

उल्लेखनिय व्यक्तींचा केला गौरव

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने यावेळी माणगांव शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते विविध स्तरात उल्लेखनिय काम केलेल्या व्यक्तींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन यथोचित सन्मान करण्यात आला. सामन्याच्या या दोन्ही दिवशी या पंचक्रोशीतील शाळकरी मुलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चांगली उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, जि.प.सदस्य राजु कविटकर, माजी जि.प.सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, माजी उपसभापती सौ. श्रेया परब, ओबीसी सेल अध्यक्ष रूपेश पावसकर, पावशी सरपंच बाळा पावसकर, कुंदे सरपंच सचिन कदम, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अजित करमळकर, रामा धुरी, अजित परब, कौशल्य जोशी, बापु बागवे, राजु गवंडे, योगेश धुरी, अनुप नाईक आदिसह कबड्डी फेडरेशनचे दिनेश चव्हाण, पंच-प्रितम वालावलकर, नितीन हडकर, किशोर पाताडे ,अमित गंगावणे,वैभव कोंडसकर आदिसह मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साई नार्वेकर यांनी करून शेवटी दिनेश चव्हाण यांनी आभार मानले.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here