मुंबई: राज्य सरकारने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे.महागाई भत्त्यातील ही वाढ मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे. महागाई भत्ता वाढ ही 1 जुलै 2021 पासूनच्या थकवाकीसह मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे, अशी माहिती परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे. 1 जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरुन 31 टक्क्यांवर गेला आहे.