सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात 2 एप्रिल रोजी पासून ते 16 एप्रिल 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी

0
179
sindhudurg map

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात गुढीपाडवा, रमजान मास प्रारंभ, श्रीराम नवमी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे व हनुमान जयंती, तसेच वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मार्चा, निदर्शने, रस्‍ता रोको यासारखी आंदोलने यासाठी मनाई आदेश जरी करण्यात आला आहे. तसेच को‍कण विभागीय मंडळातर्फे मार्च, एप्रिल-2022 मध्‍ये माध्‍यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2022 ची इ.10 वी, दिनांक 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत परीक्षा आहेत.

या कालावधीत जिल्‍हयात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी के.मंजुलक्ष्‍मी यांनी महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 37 (3) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार 2 एप्रिल 2022 रोजी पासून ते 16 एप्रिल 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागु केला आहे.

या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यांस मनाई करित आहे. कलम 37 (1) 1. शस्त्रे, साटे,तलवारी, भाले,दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. 2.अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. 3. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे. 4.व्यक्तींची किवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.) 5. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. 6.सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. कलम 37(3) 7. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे. 8. हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी याची परवानगी घेतलेली आहे.

अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही . वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here