दिल्ली: कोरोनाच्या कहरातून गेले दोन वर्ष अडकलेले सर्वच देशातील नागरिक सध्या काही दिवसांपासून सुटकेचा निश्वास टाकत असतानाच चीन आणि फ्रांस मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याच्या बातम्या येत आहेत.जगभरातील सर्वचजण कोरोनाने त्रस्त झाले आहेत.
त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट दाखल झाल्याचे वृत्त आहे.या नव्या व्हेरिएंटचे नाव XE असून हा प्रकार धोकादायक असल्याचा इशारा WHO ने दिला आहे.आपल्या देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध काढले असले तरीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी.मास्क,वारंवार हात धुणे आणि गर्दीची ठिकाणे टाळून आपली सुरक्षा करावी.हा नवा व्हेरिएंट कोरोनाच्या पूर्वीच्या ओमिक्रॉनच्या BA.2 प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे WHO ने सांगितले आहे.


