‘तुझेच मी गीत गात आहे’ही मालिका स्टार प्रवाहवर 2 मे पासून सुरु होत आहे.मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.या मालिकेच्या शूटसाठी नागपूरमधील एका शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आली आहे. मालिकेत दिसणारी घरं, आजूबाजूचा परिसर आणि विशेष म्हणजे गावकरी हे सगळं खरंखुरं असून वास्तवादी चित्रण करण्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारे या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. साधी साडी आणि वेणी अशा नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे 12 वर्षांनंतर पुनरागमन करणार आहे.


