समाजात जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर 

0
106

मुंबई- जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवत आहे. गेल्या चार महिन्यात मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरील वादग्रस्त अशा तब्बल 12,800 पोस्ट हटविल्या आहेत. समाजात हिंसा पसरवण्याचा हेतूने या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या.समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी मुंबई पोलिसांची ही विशेष शाखा कार्यरत असते.

सध्या देशात राजकीय वातावरण धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. महाराष्ट्रातही सामंजत तेढ निर्माण करणारे वातावरण निर्माण होत आहे. राजकारण्यांकडून राजकीय तसेच धार्मिक विषयांवर सतत वादग्रस्त वक्त्यव्य येत आहे. त्यामुळे मुंबईत वातावरण बिघडत जातीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून ‘सोशल मीडिया लॅब’ सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येत आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येते. लॅबच्या मध्यातून आतापर्यंत वादग्रस्त अशा 3000 पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here