मराठा आरक्षणासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना आता कोल्हापूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात आला आहे.सदावर्ते यांना मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा तसंच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळ्या केलेल्या पैशांतून सदावर्तेंनी मुंबईत मालमत्ता खरेदी केली. सदावर्तेंकडे पैसे मोजण्याचे मशीन आहे, असा दावा सरकारी वकिल प्रदिप घरत यांनी केला होता.एसटी विलिनीकरण्याच्या याचिकेसाठी मी एसटी कर्मचाऱ्यांकडून केवळ 200 ते 300 रुपये घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी कोर्टाला सांगावे. तसेच, सर्व 48 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने मी न्यायालयात बाजू मांडत होतो. ते सर्व माझे क्लायन्ट होते. पण एकानेही माझ्याविरोधात तक्रार केली नाही, असा युक्तीवाद सदावर्ते यांनी केला.

