हिंदी चित्रपटाचे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन

0
156
दिग्दर्शक टी रामा राव

 दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव याचे आज, बुधवारी निधन झाले. टी रामा राव यांनी वयाच्या 84 वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते कित्येक दिवसांपासून आजारी होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सायंकाळी चेन्नईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टी रामा राव यांनी 1966 पासून करिअरची सुरुवात केली होती. टी रामा राव यांनी दाक्षिणात्य चित्रपटांना एक वेगळं वळण दिले होते. अनेक सुपरहिट चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्यात ‘जीवन तरंगल’, ‘अनुराग देवता’ आणि ‘पचानी कपूरम’ हे त्यांचे तेलुगू चित्रपटांचाही समावेश आहे. बॉलिवूडमधील ‘अंधा कानून’, ‘एक ही भूल’, ‘मुझे इंसाफ चाहिए’ आणि ‘नाचे मयूरी’ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन त्यांनी केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here