मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाले राणा दाम्पत्य!

0
38

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्री बाहेर उद्या हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे.राणा दाम्पत्य रेल्वेने मुंबईत येणार, अशी माहिती असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आज सकाळपासूनच सीएसएमटी रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.आज विदर्भ एक्सप्रेसने राणा दाम्पत्य शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत येणार असल्याची माहिती होती. चकवा देत राणा दाम्पत्य थेट विमानाने मुंबईत दाखल होत खार येथील आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती आहे.त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा यांच्या आंदोलन इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसह वर्षा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे कायदा-सुव्यवस्थेला धक्का न पोहोचवण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here