CBSE  परीक्षा होणार 26 एप्रिलपासून सुरु

0
114

CBSE परीक्षेसाठी परीक्षा केंद्र सज्ज झाले आहेत. 26 एप्रिलपासून परीक्षा सुरु होणार आहेत.या परीक्षेसाठीचे हॉलतिकीट जवळपास महिनाभर चालणार आहेत. वाटप करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळपास महिनाभर चालणार आहेत. दहावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. तर बारावीची परीक्षा जूनपर्यंत चालणार आहेत.

सीबीएसईची दुसऱ्या सत्राची परीक्षा ही शाळांऐवजी इतर परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर द्यावी लागणार आहे.सीबीएसईची दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत चालणार आहे. तर बारावीची परीक्षा ही 15 जूनपर्यंत असणार आहे.

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील अधिक आणि नवीन माहितीसाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्यावी लागेल. सेमिस्टर – 2 परीक्षेचे हॉल तिकीट जारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट देऊन हॉल तिकीट डाऊनलोड करावे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फक्त वेबसाईटवरच नाही तर त्यांच्या शाळेमध्ये देखील हॉल तिकीट मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here