लतादीदींचे मोठे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवंगत बॉलिवूड गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले नागरिक आहेत.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान हृदयनाथ यांचा मुलगा आदित्यनाथ मंगेशकर यांनी त्यांचे वडील रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले. हृदयनाथ मंगेशकर यांना कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करायचे होते. परंतू ते तसे करू शकले नाहीत. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने ते बरे होत असून आठ ते दहा दिवसांत ते घरी परतणार आहेत.’ असेही ते म्हणाले.


