Covid19: राज्यात पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता

0
125

देशात दिल्लीसह काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क आवश्यक करावा लागेल अशी शक्यता असल्याचे सांगितले.

आज मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याचे आदेश देऊ शकतात. या बैठकीनंतरच अंतिम निर्णय होणार आहे. कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर कोविडच्या टेस्टिंगचा वेग अधिक तीव्र केला जाईल. ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट वाढवले ​​जाईल. तसेच ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी ते वाढवले जाईल असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच 6 ते 12 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल अशी माहिती देखील यावेळी टोपेंनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ५५ हजार ८४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात आज एकही रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढली असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 153 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 943 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक 549 सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतही 27 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी मुंबईत 102 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here