दिल्लीत शुक्रवारी तापमानाने 12 वर्षांचा विक्रम मोडित काढला. येथे कमाल तापमान 43.5 डिग्री नोंदवण्यात आले. यापूर्वी 2010 मध्ये 43.5 अंश सेल्सिअसहून अधिक तापमान नोंदवण्यात आले. तेव्हा एप्रिलच्या 18 तारखेला पारा 43.7 डिग्रीवर पोहोचला होता.दिल्लीत एप्रिल गत 72 वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. चालू महिन्यात येथे मासिक सरासरी तापमान 40.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारताच्या बहुतांश भागांत पुढील 2 दिवसांत तापमानात 2 डिग्रीची वाढ होण्याचा अंदाज आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात पुढील 4 दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.