बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘भूल भुलैया 2’ लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.‘भूल भुलैया 2’ धमाकेदार ट्रेलर रिलीज झाल.त्यानंतर आता चित्रपटाचे शीर्षकगीत म्हणजेच टायटल ट्रॅक देखील रिलीज झाले आहे. या टायटल ट्रॅकमधील कार्तिक आर्यनच्या डान्स मूव्ह्सने चाहत्यांनाही नाचायला भाग पाडलं आहे.
‘भूल भुलैया 2’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. त्याबरोबरच चित्रपटात अभिनेत्री तब्बू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तब्बू मंजुलीकाच्या रहस्स्याचा उलगडा करताना दिसत आहे. तर ट्रेलरच्या शेवटी कियारा अडवाणीच्या अंगात मंजुलीकाने प्रवेश केल्याचे लक्षात येते. त्यानंतर ट्रेलमध्ये एका ठिकाणी कार्तिक आर्यनचाही डबल रोल पाहायला मिळाला आहे. हॉरर आणि कॉमेडी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे.


