उष्माघाताबाबत नागरिकांनी सतर्क राहाण्यासंदर्भात राज्यांना केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स जारी

0
147
उष्माघात

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे.भारतीय हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसात आणखी उष्णता वाढणार असून तापमानाचा पारा 50 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे. महाराष्ट्रात उष्माघाताने गेल्या दोन महिन्यात 25 जणांचा बळी घेतला आहे.

केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून उष्माघाताबाबत सतर्क राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांनी केंद्राच्या गाईडलाईन्सचं पालन करावे, नॅशनल अॅक्शन प्लॅनवर लक्ष केंद्रीत करावे, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांनी उष्माघाताबाबत नियमावली तयार करावी. आरोग्य सुविधा वाढवाव्या, उष्माघात कक्ष उभारावे. उष्माघाताशी संबंधित औषधीचा साठा ठेवावा. त्यात सलाईन, आईसपॅक, ओआरएस, पेयजल यांचा पुरेसा पुरवठा करावा, अशा सूचना देखील केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here