मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक! जे.जे. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवले 

0
191

नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी दाऊदची बहिण हसीना पार्करकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अटक केली. काही दिवसांपुर्वीच त्यांची तब्येत ढासळल्याने मलिक यांच्या वकिलांकडून विशेष न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ईडीने सोमवारी या याचिकेला विरोध केला होता.

मलिक यांना सोमवारी सकाळी कमी रक्तदाब आणि पोटाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात स्ट्रेचरवरून दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी सकाळी त्यांना जेजे रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टर 24 तास त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी दिली आहे.मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे.मलिक यांची मुलगी निलोफर समीर खान हिलाही न्यायालयाने तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here