प्रतिनिधी- राहुल वर्दे (लांजा)
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी आता समर्थक आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. समर्थकांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर हि भेट झाली. भेटीवेळी राजापूरचे आमदार राजन साळवी देखिल उपस्थित होते. रिफायनरी समर्थनाचा ठराव केलेल्या ५७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ११२ गावांच्या समर्थनाच्या ठरावाच्या याद्या यावेळी समर्थकांनी उदय सामंत यांना दिल्या. त्याशिवाय विविध संघटनाच्या रिफायनरी समर्थनाच्या ठरावाच्या प्रती देखिल उदय सामंत यांना दिल्या गेल्या. समर्थनाचे ठराव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यत पोहचवा, प्रकल्पाला अललेले समर्थन दाखवण्यासाठी रिफायनरी समर्थक या निमित्ताने आक्रमक झालेले पहायला मिळाले. या भेटीसाठी आलेल्या समर्थकांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते. तर रिफायनरी समर्थकांची भेट झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या ठरावाच्या प्रती या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल आणि समर्थकांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचवण्याचे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.


