सिंधुदुर्ग: प्रशासनाच्या वरद हस्ताखाली गोवा बनवटीच्या दारूची शिरोड्यातील देवूळवाडी परिसरात राजरोस विक्री!

0
176

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

वेंगुर्ला – गोवा बनवटीच्या दारूची शिरोड्यातील देवूळवाडी परिसरात राजरोस विक्री होत आहे. या परिसरात मद्यपी दारू ढोसून धींगाणा घालीत असल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच देवूळ व शाळेच्या आसपासच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे अस असतानाही स्वच्छता अभियानाचा डींडोरा पिटणारी ग्रामपंचायत मात्र मुग गिळून गप्प आहे.

शिरोडा हे गाव गोवा हद्दीला लागून असल्याने पुर्वी पासूनच येथे गोवा बनावटीची दारूची तस्करी होते हे सर्वज्ञात आहे.संबंधीत प्रशासन लाचखाऊ वृत्तीमुळे यावर अंकुश ठेवू शकत नाही आणि येथील युवा पीढी झटपट पैसा मिळवून श्रीमंती मिळवण्यासाठी तेथील पोलीस ठाणी संबंधीत बीट आॅफीसर यांच्याशी हितसंबंध जपून या व्यावसायात गुंतली आहे. खाकीवर्दीलाही खिसाभरून पैसा मिळत असल्याने आलेल्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष केले जाते असल्याच्या तक्रारी तेथील नागरीकांच्या आहेत.

असाच काहीसा प्रकार शिरोड्यातील माऊली मंदीरच्या मागील देवूळ वाडीत शिरोडकर नामक मालकीच्या घरत वर्मा नामक इसम कसलीही भयभिती न बाळगता अनिधीकृत्त गोवा बनावटीची बनावट दारूची विक्री करीत आहे. हा अनिधीकृत मद्य विक्रीचा व्यावसाय शंभर ते दोनशे मीटर शाळा काॅलेजच्या परीसरात येत असल्याने काॅलेज तरूणाना सहज उपलब्ध होत आहे. त्याच प्रमाणे मद्यपी मद्यप्राशन करण्यासाठी तेथील गल्लीबोळाचा वापर करून तिथेच मुत्र विर्सजन करीत असल्याने दुर्गंधी तसेच रिकामी बाॅटलचा खच पडला आहे. काही मद्यपी मद्यप्राशन करून शिवीगाळ मारामारी करीत असल्याने महिला वर्गात भयाचे वातावरण तेथील परीसरात आहे.

या संदर्भात तेथील नागरीकानी वेळोवेळी तेथील पोलिस ठाण्यात तक्रारी देऊनही पोलीस दाद देत नसल्याने ओरस मुख्यालय येथील अधिक्षकांना निनावीपत्र पाठवून या प्रकारापासून परीसर मुक्त करण्याची विनंती करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या संर्दभात तेथील नागरीकांनी आता मिडीयाकडे हा प्रकार उघड केला आहे. या संदर्भात जनतेचा आवाज संबंधीत प्रशासनाला कळवून जागे करण्याची विंनंती केली आहे. तरी तेथील चाललेला अवैध गोवा बनावटीचा दारू विक्रीचा गुत्ता तेथील पोलिस अधिकारी त्वरीत कार्यवाही करून नागरीकांना दिलासा देतील अशी आशा त्यांना वाटते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here