प्रतिनिधी- सुमित दळवी
दोडामार्ग
दोडामार्ग तिलारी मुख्य राज्यमार्गावरील भेडशी खालचा बाजार येथील पुल कमी उंचीचा असल्याने मुसळधार पडलेल्या पाऊसात त्या पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी येते.त्यामुळे वाहने ही पर्यायी मार्गाने वळविली जातात त्यातच पर्यायी मार्ग हा पुर्णपणे खड्डेमय असल्याने त्याठीकाणाहुन वाहने हाकताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागतात वारंवार संबंधित विभागाचे लक्ष वेधूनसुद्धा संबंधित विभाग त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करताना दिसुन येत होते.
त्यामुळे येत्या १५ तारीख पर्यंत कामाला सुरुवात न झाल्यास रास्तारोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भिसे यांनी दिला होता.मात्र त्या इशाऱ्यानंतर बांधकाम विभागाला जाग आल्याने आज प्रत्यक्ष त्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थ तसेच वाहनधारकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.


