मुंबईकर ज्ञानेश्वरी चिंचोलीकर या मराठी तरुणीने अमेरिकेत जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. न्यूयॉर्क राज्यातील न्यायदान क्षेत्रातील सर्वात अवघड समजण्यात येणारी न्यूयॉर्क बार कॉन्सिलच्या परीक्षेत ज्ञानेश्वरीने गुणांनी प्रावीण्य मिळल्यानंतर जागतिक बँकेने तिची निवड केली.
आता तिथे अॅटर्नी म्हणून काम करण्यास पात्र ठरणार आहे. त्यासाठी जागतिक बँकेने ज्ञानेश्वरीला सात हजार अमेरिकन डॉलर्स शिष्यवृत्ती देऊ केली आहे.
ज्ञानेश्वरीचं शालेय शिक्षण वांद्रयातील एव्हीएम शाळा आणि नंतर बारावीपर्यंतचे शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. पाच वर्षांचा विधी शाखेचा अभ्यासक्रम प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ, मुंबई इथून पूर्ण केला आहे.