प्रतिनिधी – राहुल वर्दे
लांजा – रोख रक्कम असलेली आणि एसटी बस मध्ये राहिलेली बॅग मूळ मालकाला परत करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणार्या लांजा एसटी आगारातील चालक वाहक यांचा डेपो मॅनेजर संदीप पाटील यांच्या हस्ते गुरुवारी १२ मे रोजी आगारात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
लांजा एसटी आगाराची लांजा इसवली ही बस फेरी घेऊन वाहक अनिल रस्ते आणि चालक बापू खवळे हे गेले होते. या बस एसटी बस मधून प्रवास करणारे कृष्णा म्हादू जोगले (राहणार वडदहसोळ राजापूर) हे आपली बॅग हे एसटी बस मध्येच विसरून गेले होते. एसटी बसचा वाहक अनिल भगवान रास्ते यांच्या ही बॅग निदर्शनास झाली. त्यानंतर त्यांनी माहिती चालक बापू खवळे यांना दिली. नंतर एसटीच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी सदरची ही बॅग लांजा एसटी स्टँड येथील अधिकारी रवींद्र खानविलकर यांच्याकडे जमा केली. या बॅगेमध्ये रोख रक्कम १९ हजार ५०० रुपये होते.
यानंतर बॅग मालक कृष्णा जोगले यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना ही बॅग परत देण्यात आली. अशाप्रकारे एसटीत सापडलेली पैशांनी भरलेली बॅग प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करून आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणाऱ्या चालक खवळे आणि वाहक अनिल रस्ते यांचा लांजा एसटी आगारात डेपो मॅनेजर संदीप पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी रविंद्र खानविलकर, साईप्रसाद जुवेकर, जे.वि. जाधव, रमेश खानविलकर राजेश गुरव आदी कर्मचारी उपस्थित होते.


