पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्यामुळे खळबळ!

0
96

पुणे– पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.पुणे रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची माहिती मिळाली.माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी तात्काळ निकामी करण्याची कारवाई सुरु केली.या घटनेमुळे पुणे रेल्वे स्थानकावर सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला असून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुद्धा थांबवली आहे. बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत बॉम्बसदृश्य वस्तू निकामी करण्यासाठी घेऊन गेले आहेत.ही वस्तू नेमकी आली कुठून याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here