प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ – कुडाळ तालुक्यातील पाट परबवाडा येथील घराला अचानक आग लागली.सदर घरात श्री.प्रकाश सावंत आणि कुटुंबीय रहात होते.श्री.प्रकाश सावंत यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे.
भाजपा नेते माजी खासदार प्रदेश सचिव निलेशजी राणे साहेब यांनी कुटुंबांची भेट घेतली व त्याना आर्थिक मदत केली . लवकरच श्री.प्रकाश सावंत यांना शासकीय मदत मिळवून देऊ असे आश्वासन भाजपा नेते निलेश राणे यांनी दिला.


