सिंधुदुर्ग: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर!

0
32
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत

ओरोस– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  • शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी 10 वा. अलायन्स एअर विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण.
  • सकाळी 11 वा. श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय, कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती.
  • दुपारी 12.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत कोविड आजार व लसीकरण संदर्भात आढावा बैठक.
  • सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे राखीव.
  • दुपारी 2.30 वा. कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण.
  • दुपारी 3 वा. रविंद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती.
  • सायं. 6.30 वा. सावंतवाडी येथून मोटारीने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाभोली, गोवा कडे प्रयाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here