क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची क्लिनचीट

0
18

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिनचीट दिली आहे. यामुळे आता एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आर्यन खानसह 6 जणांना याप्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. सबळ पुराव्यांअभावी सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नाहीत. आर्यनला अटक करणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. 

या प्रकरणी एकूण 10 व्हॉल्यूमचे 6000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडले नव्हते.या छाप्यादरम्यान एनसीबीने 5 ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी एनसीबीने अनेकांना अटक केली. यामध्ये आर्यन खानचा देखील समावेश होता.26 दिवसांच्या प्रदीर्घ कोठडीनंतर मुंबई हाय कोर्टाने 28 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर केला. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला.

महाराष्ट्राचे अल्पसंख्यक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यात आर्यन खान प्रकरणातील आरोपींकडून लाच घेणे, बोगस जात प्रमाणपत्र तयार करणे व धर्मांतर करुन दुसरे लग्न करणे आदी आरोपांचा समावेश होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here