भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ असे विधान केले होते. त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राज्य महिला आयोगास पाटील यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.
माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्राग्याने केलेल्या उच्चारात सुप्रिया सुळे किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.


