संजय भाईप/सावंतवाडी
बांदा – बांदा शहरात दि बांदेश्वर फिटनेस क्लब या अद्ययावत व्यायामशाळेचे नुकतेच उद्घाटन कऱण्यात आले.बांद्यात श्री विठ्ठल मंदिर नजीक योगेश्वरी कॉम्प्लेक्स येथे सर्व अद्ययावत व्यायामसाहित्याने युक्त अशा या जीमचे उद् घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापुन तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी जिमचे मालक तेजस कीर आणि संदेश सावंत ,रेल्वे राष्ट्रीय खेळाडू केदार पाटील, तीन वेळा रत्नागिरी श्री चे विजेते शरीफ पंधारी, जुनिअर मिस्टर इंडिया गोल्ड मॅडलिस्ट प्रथमेश कातळकर, सिंधुदुर्ग श्री शिवाजी जाधव, जिल्हा स्तरीय शरीरसौष्ठव पटू सुधीर हळदणकर,सौरभ वारंग, मोहंमद शेख, आझाद ठाकूर, विपुल करलकर, संदीप सडवेलकर, सलमान शेख, नितीन सावंत, हितेंद्र कदम,जागा मालक शरदचंद्र महाबळ , जयंत महाबऴ , तांबुळी गावचे सरपंच अभिलाष देसाई, बेळगाव मधील प्रसिद्ध बेकरी उद्योजक उर्जित स्वामी आदिंसह अऩेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
दि बांदेश्वर फिटनेस क्लब हे जीम बांद्यात मध्यवर्ती ठिकाणी असून बॉडिबिल्डिंग तसेच फिटनेसचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन अनुभवी प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे ,त्याचा लाभ घेऊन अनेक शरिरसौष्ठवपटू बांदा पंचक्रोशीतून निर्माण होतील असा विश्वास प्रसिद्ध शरिरसौष्ठवपटू संदेश सावंत आणि तेजस कीर यांनी व्यक्त केला. अनेक मान्यवर व व्यायामप्रेमींनी यावेळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


