Covid19: अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 18 बालकांना लाभ व सेवा बाबतच्या किटचे वाटप

0
160

कोवीड-19 मुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 18 बालकांना लाभ व सेवा बाबतच्या किटचे वाटप जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या आई वडिलांची झालेली हानी पुर्तता करू शकणारी नसली तरी सर्व देश तुमच्या पाठिशी आहे. आई भारती आपल्या सोबत असून धैर्याने सामना करा. जीवनात चांगल्या पुस्तकासारखा मित्र नाही, अभ्यासाबरोबरच ‘फिट इंडिया खेलो इंडिया’ या अभियानात सहभागी होऊन त्याचे नेतृत्व ही करा. आयुष्यात खूप पुढे जा, असा अशीर्वाद दिला.

कोविड 19 च्या महामारीमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक, कायदेशीर पालक, दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, म्हणून PM Care For Children Scheme ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. पी.डी. देसाई, स्नेहलता चोरगे, डॉ. प्रतिमा नाटेकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्य कृतिका कुबल आणि पालक उपस्थित होते.

पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, ‘आपल्या माणसांना गमावल्याचे दु:ख हे शब्दात न सांगता येणारं आहे. त्यांच्या केवळ आठवणी राहतात. आयुष्यात उभे राहणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पी.एम. केअर फॉर चिल्ड्रन हा एक छोटासा प्रयत्न आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा धैर्याने सामना करा. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देश आपल्या सोबत आहे. आई भारती आपल्या सोबत आहे. ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास’ यातूनच शासन विविध योजना आपल्यासाठी आणत आहे. खूप मोठे व्हा, खूप पुढे जा अशा शब्दात त्यांनी अशीर्वाद दिले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात बालकांना तसेच पालकांना किटचे वाटप करण्यात आले. प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी. काटकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये बालकांना PM Care For Children Scheme चे पासबुक, PM-JAY हेल्थ कार्ड / आयुष्यमान कार्ड, पतंप्रधानांचे मुलांना पत्र आणि मुलांचे पीएम केअर स्नेह पत्र यांचा किटमध्ये समावेश आहे. 18 वर्षा खालील 14 आणि 18 पुढील 4 अशा 18 अनाथ बालकांचा यात समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here