मालवणात कुंभारमाठ येथे 75 रुग्ण संख्येचे कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहे, तसेच शहरात ही खाजगी हॉस्पिटल्स ला काही बेड ची परमिशन आहे…घरातली माणसें कोव्हिडं पॉझिटिव्ह असताना बाकीचे आयसोलेट असताना ऍडमिट पेशंटला जेवण पुरवणे हे फार जिकरीचे आणि अडचणीचे होऊन जाते म्हणून मालवणचे सेवाभावी संस्था नाथ पै सेवांगण ही अश्या पेशंट साठी वरील फोटोत दाखवलेली थाळी पूर्णपणे विनामूल्य पुरवत आहे…. आणि सर्व कोविड सेंटर बंद होई पर्यंत पुरवणार आहे… बऱ्याच सेवा राजकारण्यांच्या फंदात न पडता पडद्याच्या आड राहून पण करता येतात..पण इतरांना थोडी काही का होईना माहिती असावी म्हणून हा असा अट्टाहास.