पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती.सीबीआयने डीएचएफल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंना अटक केली होती.अटकेनंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना हजर करण्यात आले होते. सीबीआयने भोसलेंची 10 दिवसांसाठी कोठडी मागितली होती. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. कोर्टाने सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई केली आहे.
प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले ‘इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येथील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते.अविनाश भोसले यांनी रिक्षाचालक म्हणून पुण्यात सुरुवात केली होती.रिक्षा चालक ते मोठे बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.


