राज्य शिक्षण मंडळाने आता पदवीच्या शिक्षणासाठी काही बदल केले आहेत.सीईटीच्या गुणांसोबतच बारावी बोर्ड परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्वं वाढणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांवरून पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येत होता.परंतु आता बोर्डाचे 50 टक्के आणि सीईटीचे 50 टक्के अशा एकूण गुणांच्या आधारावर पदवी शिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्वं वाढणार आहे.सीईटीच्या गुणांच्या आधारावर होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी हा नियम लागू असणार आहे.
पुढील वर्षापासून MHT_CET चा निकाल नियमितपणे 1 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर 1 सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा 05 ते 11 ऑगस्ट 2022 दरम्यान घेण्यात येणार आहे तर, PCB ग्रुपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येईल.


