सिंधुदुर्ग: शिपाई जरी पद छोटे असले तरी त्यांनी दिलेली सेवा बहुमुल्य असते- आमदार वैभव नाईक

0
111

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

ओरोस: जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे व जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई भालचंद्र गावकर आज सेवानिवृत्त झाले.यावेळी बोलताना अधिकाऱ्यांबरोबरच शिपाई देखील शासन व्यवस्थेमधील महत्त्वाचे घटक असतात. शिपाई जरी पद छोटे असले तरी त्यांनी दिलेली सेवा बहुमुल्य असते.त्यामुळे त्यांच्या कार्याचा देखील सन्मान करणे गरजेचे असते.ही सामाजिक बांधिलकी जपत आमदार वैभव नाईक असे म्हणाले.

त्यांनी आज सेवानिवृत्त झालेले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे व जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई भालचंद्र गावकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,माजी नगरसेवक मंदार केणी,रुपेश पावसकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here