सिंधुदुर्ग : बियाणे, खते, व कीटकनाशकांच्या नियंत्रणाकरीता प्रत्येक तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना

0
87

ओरोस: खरीप हंगाम 2022 करिता जिल्हास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2022 करिता बियाणे, खते, व कीटकनाशके या कृषि निविष्ठांची गुणवत्ता या भरारी पथकाकडून नियंत्रण केले जाईल. तसेच दर्जेदार,सुरळीत व वेळेवर बियाणे, खते, व कीटकनाशके यांचा मुबलक पुरवठा होईल यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना केली आहे. तालुका कृषी अधिकारी हे या भरारी पथकांचे अध्यक्ष असून पंचायत समिती कृषी अधिकारी हे सचिव आहेत. जिल्हास्तरावरही भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांचे अध्यक्ष आहेत.

कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर कृषी निविष्ठा तक्रार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा तक्रार कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कार्यरत असणार आहे. सद्या जिल्ह्यात बियाणे, खते पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांमधून आवश्यक कृषी मालाची खरेदी करावी. तसेच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले घ्यावीत व वापरताना सुरक्षा उपयांचे काटेकोर पालन करावे.

जिल्हास्तर भरारी पथक प्रमुखांचे संपर्क क्रमांककृषी विकास अधिकारी – 9822006912, 9404305848. तालुका स्तरावरील क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कणकवली – 9404953146, मालवण – 8369934176, देवगड – 9405288050, वैभववाडी – 9421863509, सावंतवाडी – 9673258090, वेंगुर्ला – 8446360137, दोडामार्ग – 9422861615. जिल्हा स्तरावरील तक्रार कक्षाचा संपर्क क्र. – कृषी विकास अधिकारी कार्यालय – 9175142244, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय – 9420244762. तालुकास्तरावरील तक्रारकक्षाचे संपर्क क्रमांक – कणकवली – 9657841567, मालवण – 9424053189, देवगड – 9422967918, वैभववाडी – 9270787640, सावंतवाडी – 7448001108, कुडाळ – 9423025916, वेंगुर्ला – 9423053837, दोडामार्ग – 9588439320. या प्रमाणे आहेत. तरी जिल्ह्यतील शेतकऱ्यांना खते, बियाणे याबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here