प्रतिनिधी – संजय भाईप/सावंतवाडी
पुण्याहून गोव्याला भरधाव वेगात जाणार्या पर्यटकांच्या कारने पाई चालत जाणार्या महादेव वंसत झाटये (वय 45)व विलास कुडव यांना धडक दिली.धडक एवढी भीषण होती
महादेव झाटये हे जागीच ठार झाले. तर विलास कुडव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमीक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे.
हा अपघात आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास इन्सुली कौडवटेंब येथे घडला.बांदा पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.


