भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली.पंकजा मुंडे यांनी आज सकाळी एक ट्वीट करत त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ‘माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून विलिगिकरणात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या होत्या. याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी’