मुंबई- नुकतीच बारावीची परीक्षा(HSC) दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली असून, बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून १२ वीच्या निकालाबाबतच्या तारखांबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात होते. यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जावे. त्यानंतर होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा. एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा ,सबमिट करा.बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल. डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
याशिवाय विद्यार्थांना खालील संकेतस्थांवरदेखील निकाल पाहता येणार आहे.www.maharesult.nic.in, www.maharesult.nic.in. msbshse.co.in, hscresult.11thadmission.org.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in


