सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्याचा विकास शिवसेनाच करू शकते – आमदार दिपक केसरकर

0
62
दोडामार्ग तालुक्यातील पाटये पुनर्वसन व सासोली ग्रामपंचायतच्या नूतन इमारतींचा लोकार्पण सोहळा

प्रतिनिधी – दोडामार्ग/सुमित दळवी
दोडामार्ग – माजी पालकमंत्री,माजी वित्त व नियोजन मंत्री,आमदार दिपक केसरकर यांच्या खास प्रयत्नातून मंजूर झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील पाटये पुनर्वसन व सासोली ग्रामपंचायतच्या नूतन इमारतींचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. हा लोकार्पण सोहळा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना दिपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात विकासाची गंगा शिवसेनेने आणली मात्र रस्त्यावरून आम्ही टार्गेट झालो. आमची विकासकामे लोकांपर्यंत पोहचली नाहीत. आम्ही निधी मंजूर करायचा आणि दुसऱ्यांनी उदघाटन करायची असे आज पर्यंत चाललेले ,मात्र आता आम्ही मंजूर केलेल्या कामांची आम्हीच उदघाटने करू असे म्हणत आज सासोली व पाटये पुनर्वसन ग्रामस्थानी या नूतन इमारतींच्या लोकार्पण कार्यक्रमास मला आमंत्रित केले त्यामुळे मी त्यांचा आभारी असल्याचे आमदार दिपक केसरकर म्हणाले.

या कार्यक्रम प्रसंगी बाबुराव धुरी तसेच प्रेमानंद देसाई यांनी आपले विचार मांडताना या तालुक्यात विकासाची गंगा आमदार दिपक केसरकर यांनींच आणली, रस्त्यावरून नौटंकी करणारे कोरोना काळात लपले होते त्यावेळीही दोडामार्ग तालुका वासीयांना मदतीचा हात दिपक केसरकर यांनी दिला तर प्रत्यक्ष जरी उपस्थित नसले तरी त्यांच्या आदेशाने व सहकार्याने अनेक कोरोना बाधितांना दिलासा मिळाला असे सांगत आता विरोधकांनी न केलेल्या कामाविषयी नाही तर केलेल्या कामाविषयी बोलावे असे ते यावेळी म्हणाले.
दोन्ही ग्रामपंचायतच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला ज्यात पाटये ग्रामपंचायत च्या वतीने पोलीस पाटील प्रकाश गवस (अण्णा) यांनी त्यांचा सत्कार केला तर सासोली ग्रामपंचायत सरपंच दिपाली गवस यांनी सासोली ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार आमदार दिपक केसरकर यांचा सत्कार केला. पाटये ग्रामपंचायत ही २०१५ साली स्थापन झाली त्या दिवसापासून आज पर्यंत ती लवू गवस यांच्या घरात कार्यान्वित होती त्यासाठी ते नाममात्र भाडे आकारत होते यासाठी त्यांचा सहकार्य म्हणून विशेष सत्कार आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर सासोली ग्रामपंचायतला विनामोबदला जमीन देणाऱ्या श्री हुमरस्कर यांचाही सत्कार आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा उपसंघटक संजय गवस, माजी जि . प. सदस्या संपदा देसाई, उपतालुकप्रमुख प्रेमानंद देसाई, नगरसेवक चंदन गावकर, पाटये पुनर्वसन माजी सरपंच अनिल नाईक, माजी पोलीस पाटील प्रकाश गवस, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, पाटये पुनर्वसन ग्रामसेवक मर्तोजी तारी, महिला जिल्हा आघाडीप्रमुख विनिता घाडी, महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, यांसह दादा देसाई, रामदास मेस्त्री, भगवान गवस, मिलिंद नाईक, सासोली सरपंच दीपाली धाऊस्कर, माजी सभापती दयानंद धाऊस्कर, सासोली ग्रामसेवक सासोली ग्रा. पं. सदस्य कृष्णा गवस, सासोली पोलीस पाटील संजय गवस, हर्षद सावंत, निलम परब, संदेश राणे,लोबो यांसह पाटये पुनर्वसन व सासोली ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोडामार्ग तालुक्याचा विकास शिवसेनाच करू शकते : केसरकर

माजी पालकमंत्री,माजी वित्त व नियोजन मंत्री,आमदार दिपक केसरकर यांच्या खास प्रयत्नातून मंजूर झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील पाटये पुनर्वसन व सासोली ग्रामपंचायतच्या नूतन इमारतींचा लोकार्पण सोहळा आज पार पडला, हा लोकार्पण सोहळा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला, यावेळी बोलताना दिपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात विकासाची गंगा शिवसेनेने आणली मात्र रस्त्यावरून आम्ही टार्गेट झालो आमची विकासकामे लोकांपर्यंत पोहचली नाहीत. आम्ही निधी मंजूर करायचा आणि दुसऱ्यांनी उदघाटन करायची असे आज पर्यंत चाललेले मात्र आता आम्ही मंजूर केलेल्या कामांची आम्हीच उदघाटने करू असे म्हणत आज सासोली व पाटये पुनर्वसन ग्रामस्थानी या नूतन इमारतींच्या लोकार्पण कार्यक्रमास मला आमंत्रित केले त्यामुळे मी त्यांचा आभारी असल्याचे आमदार दिपक केसरकर म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी बाबुराव धुरी तसेच प्रेमानंद देसाई यांनी आपले विचार मांडताना या तालुक्यात विकासाची गंगा आमदार दिपक केसरकर यांनींच आणली, रस्त्यावरून नौटंकी करणारे कोरोना काळात लपले होते त्यावेळीही दोडामार्ग तालुका वासीयांना मदतीचा हात दिपक केसरकर यांनी दिला तर प्रत्यक्ष जरी उपस्थित नसले तरी त्यांच्या आदेशाने व सहकार्याने अनेक कोरोना बाधितांना दिलासा मिळाला असे सांगत आता विरोधकांनी न केलेल्या कामाविषयी नाही तर केलेल्या कामाविषयी बोलावे असे ते यावेळी म्हणाले.

दोन्ही ग्रामपंचायत च्या वतीने आमदार दिपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला ज्यात पाटये ग्रामपंचायत च्या वतीने पोलीस पाटील प्रकाश गवस (अण्णा) यांनी त्यांचा सत्कार केला तर सासोली ग्रामपंचायत सरपंच दिपाली गवस यांनी सासोली ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार आमदार दिपक केसरकर यांचा सत्कार केला. पाटये ग्रामपंचायत ही २०१५ साली स्थापन झाली त्या दिवसापासून आज पर्यंत ती लवू गवस यांच्या घरात कार्यान्वित होती त्यासाठी ते नाममात्र भाडे आकारत होते यासाठी त्यांचा सहकार्य म्हणून विशेष सत्कार आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर सासोली ग्रामपंचायतला विनामोबदला जमीन देणाऱ्या श्री हुमरस्कर यांचाही सत्कार आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा उपसंघटक संजय गवस, माजी जि . प. सदस्या संपदा देसाई, उपतालुकप्रमुख प्रेमानंद देसाई, नगरसेवक चंदन गावकर, पाटये पुनर्वसन माजी सरपंच अनिल नाईक, माजी पोलीस पाटील प्रकाश गवस, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, पाटये पुनर्वसन ग्रामसेवक मर्तोजी तारी, महिला जिल्हा आघाडीप्रमुख विनिता घाडी, महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, यांसह दादा देसाई, रामदास मेस्त्री, भगवान गवस, मिलिंद नाईक, सासोली सरपंच दीपाली धाऊस्कर, माजी सभापती दयानंद धाऊस्कर, सासोली ग्रामसेवक सासोली ग्रा. पं. सदस्य कृष्णा गवस, सासोली पोलीस पाटील संजय गवस, हर्षद सावंत, निलम परब, संदेश राणे,लोबो यांसह पाटये पुनर्वसन व सासोली ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here