रत्नागिरीच्या सौ . लक्ष्मी मंदार ढेकणे ‘महामिनीस्टर’ मध्ये ठरल्या सव्वा लाखाच्या पैठणीच्या मानकरी

0
164

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील सौ . लक्ष्मी मंदार ढेकणे ( रा . खालची आळी , रत्नागिरी ) या झी मराठी वाहिनीवरील महा मिनीस्टर कार्यक्रमात रत्नागिरी केंद्राच्या सव्वा लाखाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

मुंबईत 3 स्टार हॉटेल मध्ये राहण्याची , नाष्टा , जेवणाची , प्रवासाची उत्कृष्ट सोय केली गेली . ट्रॉम्बे येथे esel स्टुडिओ मध्ये शुटींग हा प्रत्येकीसाठी अविस्मरणीय व नवीन अनुभव होता .नव्वद स्पर्धकांमधून खेळ खेळून 15 स्पर्धक निवडले गेले . -५ जणीचे ग्रुप करून खेळाद्वारे १० जणीची निवड झाली आणि या १० जणींमध्ये प्रश्नोत्तर फेरीतून 5 जणी निवडल्या गेल्या .

प्रिया मनोरकर , वरदा मुळ्ये , रश्मी गुरव , अपूर्वा पवार व लक्ष्मी ढेकणे या 5 जणींमध्ये अंतिम सामना रंगला आणि त्यात रत्नागिरीच्या सौ लक्ष्मी मंदार ढेकणे या विजयी होऊन सव्वा लाखाच्या पैठणीच्या व सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या .

त्याचे प्रक्षेपण रविवार दिनांक ०५ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ प्रतिनिधी – पांडुशेठ साठमा अभिमन्यू वेंगुर्लेकर या वेळेत झी मराठी वहिनी वर होईल . झी मराठीने प्रत्येक वहिनीचा सन्मान केला कुणाला मणिमंगळसूत्र , कुणाला मेकअप बॉक्स , कुणाला करंडा . सर्वजणी एकमेकींच्या आनंदात सहभागी होत्या . प्रत्येक वहिनी ही स्वतःच्या घरची होममिनीस्टर होती . विजेती होती .

यापुढे महाराष्ट्रातील १० विजेत्यांमधून अकरा लाखाची पैठणी मिळविण्यासाठी ढेकणे वहिनींना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here