ओरोस: फुलांची तोरणे सुरेख आरास,सुबक नक्षीदार रांगोळी,शौर्याची गाथा पोवाडा, राष्ट्रगीत अन गर्जतो महाराष्ट्र माझा, या गिताच्या ऊर्जेमय वातावरणात आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी प्रजित नायर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराजगुढीचे पूजन करून उभारण्यात आली. विधिवत गुढीचे तसेच शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विशाल तानपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी तावडे यांच्यासह विविध खाते प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते


