अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.या चित्रपटात रिंकू अँसिड हल्ल्याची बळी ठरलेल्या तरुणीची भूमिका साकारते आहे. या फोटोत रिंकूचा चेहरा भाजलेला दिसतो आहे.हा फोटो अभिनेत्री रिंकू अभिनेत्री रिंकू राजगुरूंने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा हिने केले आहे. येत्या 17 जून 2022 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रिंकूसोबत अभिनेता मकरंद देशपांडे हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपचाच्या ट्रेलरमुळे रिंकू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


