सिंधुदुर्ग: प्रा.मोहनराव देसाई यांचे कार्य दिपस्तंभासारखे – जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर

0
101

प्रतिनिधी – दोडामार्ग / सुमित दळवी
सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सामाजिक शैक्षणीक जडणघडणीत प्रा. मोहनराव देसाई यांचे योगदान दिपस्तंभासारखे असून त्यांनी संस्कारी पिढींची निर्मीती केली, त्यांच्या या योगदानीची दखल मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांनी आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरव केल्याचा आपणास अभिमान वाटतो असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी मुंबईतील पुरस्कार वितरण प्रसंगी केले.

मुंबई दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय सुरेद्र गावकर सभागृहात झालेल्या पुरकार वितरण कार्यक्रमात त्यांनी हे गौरवोद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ कलाकार ए.के.शेख, जेष्ठ साहित्यीक व शिक्षणतज्ञ डाँ.लक्ष्मण शिवणेकर, प्रा.श्रीमती सराफ, मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ विरवटकर आदी उपस्थित होते.

खांडेकर यांनी प्रा. मोहनराव देसाई यांनी गेल्या अनेक दशकापासून दक्षिण कोकणात शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरीव काम केलेले आहे, नाविण्यपूर्वक उपक्रम राबविताना त्यांनी संस्कृत सक्षम पिढीची निर्मित करण्यावर भर दिला असून त्यांचे शेकडो विदयार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. असे हे आदर्शवत व गुरुतुल्य व्यक्तीमत्व ज्यांच्या नशिबी आले ते भाग्यवान आहेत, त्यांनी केवळ सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रातच काम केले असे नाही तर सहकार,राजकारण,तसेच शासनाच्या विविध समित्यावरही काम केले आहे, हे करत असताना तरुणांना रोजगार देण्यावरही त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिला आहे.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची आदर्श प्राचार्य पुरस्कारासाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब असण्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here