कुडाळ- जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांच्या मार्फत क्रेडिट आउटरीच मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार 8 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वा ते दुपारी 2 वा. यावेळेत महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल नजीक कुडाळ येथे आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवासी उपजिल्हाधिकरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमामध्ये विविध शासकीय खात्याचे अधिकारी बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सामाजिक सुरक्षा योजना, कर्ज योजना, विविध सरकारी प्रायोजित योजना याबाबतची माहिती देण्यासाठी बँकाचे अधिकारी तसेच शासकीय विभागांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्राला उपस्थित राऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक यानी केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याला दि 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मा. पंतप्रधान यांचे हस्ते दि 12 मार्च 2022 रोजी ‘आजादी का अमृत माहोत्सव‘ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत केंद्रीय वित्त विभाग यांचे निदर्शनुसार जून 2022 मधील दुसरा आठवडा 6ते 12 जून 2022 हा आयकोनिक आठवडा म्हणून जाहीर झाला आहे. या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी बँकाच्या वतीने क्रिडिट आउटरिच प्रोग्राम, वित्तीय साक्षरता अभियान, सामाजिक सुरक्षा अभियान, कर्ज मंजूरी पत्र वाटप ई. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हातील सर्व नागरिकांना या अभियानामध्ये सहभागी होऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अग्रिण बँकाचे प्रबंधक यांनी केले आहे.


