बारसु – सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात जागरण आंदोलन केले.गेले काही दिवस या भागात ड्रोन सर्वे, भू सर्वेक्षण बेकायदेशररित्या सुरू असल्याच्या अनेक तक्रारी जागा मालकांनी, बारसु – सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. त्याशिवाय या सर्वांनी तहसीलदार , राजापूर शहर पोलीस स्थानक , साखरी नाटे सागरी पोलीस स्थानक , पोलिस अधीक्षक यांचेकडेही याबाबत टँकर दिली होती.परंतु ग्रामस्थांच्या,संघटनेच्या तक्रारींकडे कोणत्याही यंत्रणेने दाद दिली नाही.
गोवळ ग्रामस्थांनी ६ जून रोजी कसलेही ओळखपत्र नसलेल्या तीन व्यक्तींना सर्वेक्षण करताना पोलिसांच्या हवाली केले होते. परंतु त्यांना सोडून देण्यात आले. बुधवारी शिवणे खू. गावाच्या सड्यावर जमिनीत होल पाडून सँपल घेण्यासाठी एका गाडी सह ७-८ कर्मचारी आले होते.त्यावेळी तेथे काम करत असलेल्या शेतकरी ग्रामस्थांनी त्यांना हटकले असता कर्मचाऱ्यांनी एम आय डी सी चे कर्मचारी आहोत असे सांगितले.परंतु या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र, सर्वेक्षण करण्यासंबंधीचे कोणतेही कागदपत्र नव्हती. थोड्याच वेळात तेथे पूर्ण गाव,आणि देवाचे गोठणे, गोवळ, सोलगाव येथूनही ग्रामस्थ जमा झाले.
त्यांनतर काही वेळातच ग्रामस्थ गोळा झाल्याचे कळताच पोलिस यंत्रणाही दाखल झाली. ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे संध्याकाळी डी.वाय.एस.पी.साळोखे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी बोलणी करीत पोलिस यंत्रणेची तक्रार दाखल केली .रत्नागिरी एस पी डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्याशीही ग्रामस्थांचे बोलणे झाले.पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस बंदोबस्तात घेऊन गेले.
तपासाअंती हे सर्व कर्मचारी शासकीय नसून आर.आर.पी.सी.एल. कंपनीने कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या एजंसीचे होते. त्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र , परवानगीचे पत्र नव्हते.गेली २० दिवस संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्या बेकायदेशीर सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष करत होते. पोलिस उडवा- उडविची उत्तरे देत होते .ग्रामस्थांच्या तक्रारीला कुणीही अधिकारी उत्तरच देत नव्हते.त्यामुळे अवघ्या प्रशासनालाच रिफायनरी कंपनीने विकत घेतले आहे का? अशी शंका ग्रामस्थांना येऊ लागली आहे.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये कुणीही त्यांच्या जमिनीत येऊन कसलीही सर्वेक्षण करते याचा प्रचंड राग होता.त्यामुळे बुधवारी रात्री ग्रामस्थांनी शिवणे खु. येथील सड्यावरच धरण आंदोलन करायचे ठरवले.जोपर्यंत बेकायदेशीर सर्वेक्षण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही , योग्य ती कागदपत्रे दाखवली जात नाहीत तोपर्यंत धरण द्यायचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांनी जेवणही रात्री सड्यावरच केल.त्याशिवाय रिफायनरी विरोधी पोवाडे,भजन याचा घोष सुरू आहे. सरकार विरोधी राग प्रचंड आहे.
सामान्य ग्रामस्थांच्या तक्रारीला कोणी उत्तरच देत नाही आहे. उघडपणे बेकायदेशीर सर्वेक्षण सुरू आहे . कुणी लोकप्रतिनधीं याबाबत काहीही बोलायला तयार नाही. सर्व पक्षीय नेतेही गप्प आहेत.आपल्या कोकणवासीय बांधवांसाठी एकत्र या. संघर्ष मोठा आहे.पण तो आपण एकत्रपणे नक्कीच जिंकू असा विश्वास देत बारसु – सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना ग्रामस्थांच्या साथीला उभी ठाकले आहेत.या संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे,
सचिव सतीश बाणे, कमलाकर गुरव – उपाध्यक्ष,सरचिटणीस नरेंद्र जोशी ( मुंबई),वैभव कोळवणकर अध्यक्ष (मुंबई)उपस्थित होते.


