दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्ली येथील गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोनासंबधित त्रास बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले होते. पण आता त्रास वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस सोनिया गांधींना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.आता सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याची माहिती कळताच काँग्रेसचे कार्यकर्ते चिंतेत आले आहेत. दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीनं सांगितलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.


