४४ कामांचा समावेश ; ३५ किलोमीटर पाणंद रस्त्यांच्या आराखड्यास मान्यता;आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
आमदार वैभव नाईक यांनी सुचवलेली कुडाळ मालवण तालुक्यातील पाणंद रस्त्याची कामे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजना अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षीच्या आराखड्यात समाविष्ट करून त्या आराखड्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.या कामांसाठी ८ कोटी ७५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.यात कुडाळ मालवण तालुक्यातील एकूण ४४ कामांचा समावेश असून एकूण ३५ किलोमीटरचे पाणंद रस्ते होणार आहेत. यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, रोजगार हमी व फलोद्यान मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजना अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षीच्या आराखड्यात समाविष्ट असलेली कामे पुढीलप्रमाणे
कुडाळ तालुक्यातील वर्दे मुख्य रस्ता ते गोसावी वाडी मठ मार्गे गावठण ५०० मी, कुंदे मुख्य रस्ता ते खांदारे वाडी रस्ता १ किमी, पोखरण सांद्रेवादी बस थांबा ते वरचीवाडी तावडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता १ किमी, झाराप गावकरवाडी मुख्य रस्त्यापासून शंकर महम्मद कालेलकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता १ किमी, हिर्लोक वरची परबवाडी लिंगेश्वर मंदिर मुख्य रस्ता ते भिवा परशुराम परब यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता ५०० मी, मांडकुली मुख्य रस्ता ते पावणाई नाईक वाडी ते शेगलेवाडी नदीपर्यंत जाणारा रस्ता ५०० मी, पावशी मिटक्याची मुख्य रस्ता ते पचकलमवाडी जाणारा रस्ता १ किमी, आकेरी भगत वस मंदिर ते ब्राम्हणमंदिर ते भागाबाई लक्ष्मण वरक यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता १.५ किमी, नेरूर क. नारूर देवघरवाडी ते वाडमळा रस्ता १ किमी, पावशी तवटे म्हाडेश्वरवाडी रस्ता ते क्षेत्रफळकडे जाणारा रस्ता ५०० मी, भरणीसुंदर वाडी मुख्य रस्ता ते तेरसे यांच्या घरापासून डोमनाच्या गाळवी पर्यत जाणारा रस्ता १ किमी. पुळास बांबरवाडी वरची वाडी रस्ता १ किमी, केरवडे तर्फ माणगाव मुख्यरस्ता जगन्नाथ मंदिर ते घाडीवाडी महापुरुष पर्यत जाणारा रस्ता ५०० मी, नेरूर चर्च ते खडपाचे गाळव रस्ता १ किमी, कवठी देऊळवाडी ते अन्नशांत वाडी रस्ता १ किमी, कुंदे मुख्य रस्ता ते आईणमळा वाडी ते भटवाडी आंबेडकर नगर जाणारा रस्ता १ किमी, आवळेगाव मुख्य रस्ता ते देवी सोनलाई मंदिर पर्यत जाणारा रस्ता १ किमी, हुमरस ग्रा. प. कार्यालय ते मौनी महाराज मठ उंचवळा रस्ता ते फर्नांडीस यांचे घरापर्यंत जाणारा रस्ता ५०० मी.
मालवण तालुक्यातील वायरी देवली रस्ता ते उदय मोरे घर रस्ता ५०० मी, पळसंब गावठणवाडी गोलतकर घर ते झरीचा व्हाळ साकवाकडे जाणारा रस्ता ५०० मी, कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन मालवण मार्गापासून ते औदूत निकम यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता ५०० मी, पोईप वेताळ मंदिर ते भिकाजी बाबाजी नाईक यांच्या घराकडे जाणारा रस्ता ५०० मी, मसुरे – देऊळवाडा भरतेश्वर मंदिर होळीचा मंद ते साळकर घर जाणारा रस्ता ५०० मी, चिंदर बागवाडी ते रेवडेकर घराकडे जाणारा रस्ता १ कि.मी, धामापूर गवळदेव ते बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता ५०० मी, वायंगवडे मुख्य रस्ता पडोसवाडी ते पांडुरंग बाबुराव परब यांच्या घराजवळ जाणारा रस्ता ५०० मी, किर्लोस गावठणवाडी ते डेरवणे रस्ता १.५ कि.मी, हिवाळे मुख्य रस्ता ते काशिनाथ हिवाळेकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता ५०० मी. मसदे गावडेवाडी ते भटवाडी जाणारा रस्ता ५०० मी,मसुरे खाजणवाडी बस स्टोप ते शिवाजी गावकर यांच्या घरपर्यंत जाणारा रस्ता ५०० मी, बिळवस कोणीवाडी ते व्हाळवाडी ते गणेश कोंडकडे जाणारा रस्ता ५०० मी, सुकाळवाड तळगाव मुख्यरस्ता ते खांदवाडी तुळसकर घरापर्यंत जाणारा रस्ता ५०० मी, असरोंडी टाटरबाव मुख्य रस्ता ते धनगरवाडी काजरमळा जाणारा रस्ता खडीकरण करणे १.५ कि.मी, नांदरूख घारटणवाडी बाबुराव सडयलकर घरालगत मुख्यरस्ता ते घरटणवाडी जाणारा रस्ता ५०० मी.रामगड गांगेश्वर मंदिर ते पाणंद चव्हाणवाडी रस्ता ५०० मी, देवबाग शाळा नं.१ ते नदीकिनाऱ्यापर्यंत जाणारा रस्ता ५०० मी, मठ बु. विठ्ठल मंदिर रखुमाई मंदिर ते गावडेघरापर्यंत जाणारा रस्ता १.५ कि.मी, देवली बैसनमळी ते वटीचा व्हाळ जाणारा रस्ता १कि.मी, आचरा चंद्रकांत खोत घर ते पेडणेकर बीच पर्यंत जाणारा रस्ता ५०० मी, महान वरचीवाडी भवानी मंदिर रस्त्यापासून शिवराम इळकर घर ते शामसुंदर माने घरापर्यंत जाणारा रस्ता ३०० मी, ओवळीये शाळा नं. २ ते परबवाडी पर्यंत जाणारा रस्ता १.५ कि.मी, सुकळवाड बाजारपेठ स्मशानभूमी ते गणेश कोंड पर्यंत जाणारा रस्ता २ कि.मी, बिळवस हायस्कूल ते कोनिवाडी रस्ता खडीकरण करणे. ता. मालवण ५०० मी,मालोंड पूर्ण प्राथमिक शाळा बेलाचीवाडी ते पावणाई मंदिर जाणारा रस्ता ५०० मी.या कामांचा समावेश आराखड्यात आहे.