मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही : शरद पवार

0
23
शरद पवार,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आवाहन

मुंबई – देशातील राज्यसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अशा स्थितीत सत्ताधारी भाजप असो वा विरोधी पक्ष, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले जाण्याची शक्यता विरोधी गोटातून वर्तवली जात होती. मात्र, खुद्द शरद पवार यांनी या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.

पवार म्हणाले की, मी विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही. सोमवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. पवारांच्या या वक्तव्यामुळे विरोधी छावणीत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला होता.

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत शरद पवार यांचे नाव अनेकदा येत आहे. मात्र, खुद्द शरद पवार वेळोवेळी अशा अटकळांना पूर्णविराम देत आहेत. यावेळच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार यांचे नाव सुचविल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here