सिंधुदुर्ग: सुब्रतो फुटबॉल कप सबज्युनियर / ज्युनियर क्रीडा स्पर्धेचे आयोजन

0
23

ओरोस: यंदाची 61 वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो फुटबॉल कप सबज्युनियर / ज्युनियर क्रीडा स्पर्धा सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा सन २0२२-२३ आयोजीत करण्यात येत आहे. या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा दिनांक 1 सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर २0२२ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित होणार आहे.

जिल्हस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. दिनांक ५ जुलै २0२२ रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी नोंद घ्यावी. तसेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांसाठी खाली अटींची पूर्तता असणे आवश्यक आहे.

खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
* वयोगट 14 वर्षाखालील मुले (सबज्युनियर) 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
* 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
* जे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापुर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी नोंद घ्यावी व आपला फुटबॉलच्या संघास स्पर्धा ठिकाणी उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here