सिंधुदुर्ग: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी वर्ग जागतिक योगा दिवस करणार साजरा

0
35

ओरोस: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी वर्ग जागतिक योगा दिवस साजरा करणार आहेत. जागतिक योगा दिवस दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 8 वाजता साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी.बी.म्हालटकर यांनी दिली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती मालवण, देवगड,कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी यांच्या मार्फत जागतिक योगा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिवाणी न्यायालय, कुडाळ व दोडामार्ग येथेही हा योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी योगा दिवस साजरा करावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री. म्हालटकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here